मनसेने कात टाकली? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फेरीवालाविरोधी आंदोलन चांगलेच गाजले. मुंबई, पुण्यासारख्या बड्या शहरांमध्ये फेरीवाला ही समस्या होऊन राहिली आहे. कोणीही, कसाही, कुठेही धंदा करतो. त्याच्यासाठी कर भरणार्यांनी मात्र अंग चोरून चालायचे, अशी या शहरांची अवस्था होती. त्याबद्दल कितीही तक्रारी केल्या, विनंती, अर्ज केले तरी फेरीवाल्यांवर कारवाई होत नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने फेरीवाल्यांबाबत काही नियम घालून दिले होते. फेरीवाल्यांना रेल्वे स्थानकापासून दिडशे मीटरच्या परिसरात बसू द्यायचे नाही, असे स्पष्ट आदेश न्यायालयाचे होते. पण त्या आदेशाकडे कानाडोळा करत फेरीवाले मुंबईकर, पुणेकरांच्या जीवावर रस्त्यात, फूटपाथवर धंद करत होते. कायदे, नियम सर्व तयार असताना भ्रष्टाचारी सरकारी यंत्रणा मात्र फेरीवाल्यांवर कारवाई करायल तयार नव्हती. अशा परिस्थितीत मुंबईत एल्फिस्टन रोड रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना घडली. एक वेळी २३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. मुंबईतील या भयानक घटनेने मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकला. आपण असेच किड्यामुंगीसारखे मरत रहाणार. नियम, कायदे दाखवत परप्रांतियांच्य...
सर्वसामान्यच खरा अर्थतज्ज्ञ ७ नोव्हेंबर २०१७, वार : मंगळवार वेळ : सकाळी ६ वा. चाळीतील व्यायामशाळेत माझ्यासोबत दोन तरुण व्यायाम करत होते. व्यायाम संपल्यावर त्यांना सहज विचारले, ‘नोटाबंदीमुळे तुम्हाला काय अडचण आली?’ त्या दोन तरुणांपैकी एकाने सांगितले की, आम्हाला कायच अडचण नाही. पण नोटाबंदीमुळे खूप प्रॉब्लेम झाला असे सांगतात. आम्हाला तशी काहीच अडचण आलेली नाही. वेळ : सकाळी ७.३० वा. चाळीखाली रस्त्यावरील चहाचा स्टॉल. चहावाल्यालाच विचारले, ‘परशा नोटबंदी झाली त्यामुळे तुला काय प्रॉब्लेम आला का रे?’ तो उत्तरला, ‘अहो साहेब, नोटबंदी झाल्यापासून बीएमसी खूप त्रास द्यायला सुरुवात केली आहे. अगोदर महिन्यातून कधीतरी चोरगाडी यायची. आता रोज येते. खूप त्रास होतोय साहेब. बाकी कायच त्रास नाय बघा.’ वेळ : सकाळी ८.१० वा. दारात आलेला भय्या मासेवाल्याकडून पत्नीने मासे घेतल्यावर त्याला नोटबंदीबद्दल विचारले. तो म्हणाला, साहाब फिरसे होनेवाली है क्या नोटबंदी? वो टाईम थोडी तकलिफ हुई| पर बाद में सबकुछ ठिक रहा| अब कुछ प्रॉब्लेम नही है| वेळ : सकाळी ९.३० वा. चाळीखाली आलेल्या टॉमेटोवाल्याला विचारताच तो म्हण...
रा. स्व. संघाबद्दलचा आकस कशाला? मागच्या मे महिन्यात कोकणात पत्नीच्या गावी गेलो होतो. गावातल्या देवळात काही मंडळी बसली होती. त्यापैकी मला ओळखत असलेल्या एकाने माझी इतरांना ओळख करून दिली. हे पत्रकार आहेत, असेही पुढे सांगितले. त्यामुळे मग गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील अडचणींचा पाढा माझ्यापुढे वाचणे सुरू झाले. त्यातून मार्ग कसा काढता येईल याचीही विचारणा झाली. मुख्यमंत्र्यांपर्यंत गार्हाणे मांडा असेही एका वयस्क गृहस्थांनी सांगितले. तितक्यात एका आजोबांनी शंका काढली. ‘तुमची आरएसएसमध्ये ओळख हा काय वो!,’ आजोबा म्हणाले. त्यांच्या प्रश्नाने मी चकीत झालो. कारण तो गाव आणि आजूबाजूच्या परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम नाही. गावातील मंडळींचा संघाशी कधी संपर्क आलेला नाही. तरीही आजोबा मात्र संघाबद्दल विचारत होते. ‘तुम्हाला कशाला संघ हवाय.’, असा प्रश्न मी त्यांना केला. त्यावर संघवाल्यांनी सांगितल्यानी तर भाजपवाले लवकर काम करतील, अशी पुश्ती त्या आजोबांनी जोडली. माझे लग्न झाल्यापासून मी दरवर्षी पत्नीच्या गावी जात आहे. मात्र मागील १६ वर्षांत संघ स्वयंसेवक पत्नीच्या गावी न पोहचताही संघ मात्र ति...
Comments
Post a Comment