Posts

सेना-भाजपने एकत्र यावे राज्यात यापुढे शिवसेना-भाजप युती होणार का, हा प्रश्‍न आता शिल्लक राहिलेला नाही. सुमारे तीन दशके या दोन पक्षांनी मांडलेला संसार आता जवळजवळ तुटला आहे. राजकारणातील मतभेदापासून ते नळावरील भांडणापर्यंत अनेक गोष्टी युतीमध्ये झाल्या. २०१४ सालच्या विधान सभा निवडणुकीपूर्वी तुटलेली युती जरी हे दोन्ही पक्ष राज्यात एकत्र आले असले तरी अद्याप सांधलेली नाही. कारभार एकत्र होत असला तरी मने दुभंगलेलीच आहेत. त्यामुळे हे दोन पक्ष पुन्हा निवडणुकीसाठी एकत्र येतील असे कोणीही ठामपणे सध्या तरी सांगू शकत नाही. नेमका हाच या दोन पक्षांचा घात ठरू शकतो. कारण हिंदुत्त्वाच्या मुद्यावर एकत्र आलेले हे दोन पक्ष आज त्याच मुद्याने जोडले जाऊ शकतात. दुसरे म्हणजे सेना किंवा भाजपने कितीही ठरवले की, आपण अन्य कुठल्या तरी पक्षांशी घरोबा करावा तरी ते शक्य नाही. आतापर्यंत या दोन्ही पक्षांना कथित सेक्युलर पक्षांनी जातीयवादी म्हणून हिणवले आहे. त्यातच या कथित सेक्युलर पक्षांना पर्याय म्हणून मतदार या दोन पक्षांच्या मागे उभा राहिलेला आहे. त्यामुळे या सेना-भाजप पैकी कोणीही कॉंग्रेस अथवा राष्ट्रवादीशी घरोबा केल...
Image
बहुजन आणि दलित   राज्यात गैरकॉंग्रेसी सरकार आले की, दलितांवर अन्याय, अत्याचार होत असल्याची आवई उठवली जाते. कथित सवर्णांकडून दलितांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप होतो. हे सवर्ण कोण? देशातील ब्राह्मण अत्याचार करण्याच्या मनस्थितीत नाहीत. आताच ते अल्पसंख्याक झाले आहेत. अनेक ब्राह्मण तरुण देशात वाव नाही म्हणून अगोदरच परदेशात स्थायिक झाले आहेत. ब्राह्मणांचे दलितांशी रोटी-बेटीचे व्यवहारही झाले आहेत. अशा परिस्थितीत ते खरंंच दलितांवर अन्याय, अत्याचार करतील का? मग अन्याय, अत्याचाराचा कांगावा करून सवर्ण कोणाला ठरवलं जातंय? उजवी विचारसरणी, देशनिष्ठा, देशाचा गौरवशाली इतिहास, भारतीय संस्कृती, सणांबद्दल आस्था ठेवणारे या सर्वांनाच सवर्ण या संज्ञेत सामावून त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जातेय. त्यातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नेहमीच अशा अत्याचाराचा कांगावा करणार्‍यांचा बळीचा बकरा झालाय. त्याचा बागुलबुवा उभा करून डावे पक्ष आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम करत आहेत. त्यातून मग हिंदु प्रथा-परंंपरांना मानणारे आरोपी ठरवले जात आहेत. ही नवी विचारसरणी देशाला आणि देशाच्या अखंडत्त्वाला घा...
Image
बहुजन समाज म्हणजे काय? बहुजन हा शब्दच मुळात आर्थिक निकषांवर समाजात निर्माण झालेल्या वर्गांबाबत आहे. त्यात जातीचा कोणताच संबंध येत नाही. एखादा व्यक्ती आपल्या गरिबीमुळे अपेक्षित सर्वसामान्य जीवन जगू शकत नाही. संघर्ष करूनही त्याला दोनवेळचे पोटाला मिळत नाही ती व्यक्ती बहुजन समाजात मोडते. मग ती ब्राह्मण असेल अथवा दलित. त्यात जातीचा कोणताही प्रश्‍न येत नाही. अशी व्यक्ती समाजातील वरिष्ठ वर्गाच्या दबावात असते. तिला मूठभर आर्थिक संपन्न लोक नियंत्रित करत असतात. अशा शोषित व्यक्ती संख्येने जास्त असल्यामुळे त्यांचा समाज तयार होतो, तोच बहुजन समाज असे गृहित धरणे अपेक्षित आहे. समाजात वावरताना अशा शोषित व्यक्ती असंख्य दिसतात. त्या व्यक्तींना रहाण्यासाठी घर, अंगभर कपडे, कमाईचे साधन आणि मुख्य म्हणजे दोन वेळेचे जेवण आवश्यक असते. तरच त्या व्यक्तींना मनुष्य म्हणून पाहिले जाऊ शकते. या मूलभूत गरजा न भागलेल्यांचा आणि ज्यांच्या या गरजा भागल्या आहेत, अशांचा एक समाज मानवाच्या उत्क्रांतीसोबत विकसित झाला तो अद्यापही कायम आहे, असे कार्ल मार्क्स एका ठिकाणी म्हणतो. अर्थात मार्क्सला जात, धर्म मान्य नसल्यामुळ...
Image
रा. स्व. संघाबद्दलचा आकस कशाला? मागच्या मे महिन्यात कोकणात पत्नीच्या गावी गेलो होतो. गावातल्या देवळात काही मंडळी बसली होती. त्यापैकी मला ओळखत असलेल्या एकाने माझी इतरांना ओळख करून दिली. हे पत्रकार आहेत, असेही पुढे सांगितले. त्यामुळे मग गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील अडचणींचा पाढा माझ्यापुढे वाचणे सुरू झाले. त्यातून मार्ग कसा काढता येईल याचीही विचारणा झाली. मुख्यमंत्र्यांपर्यंत गार्‍हाणे मांडा असेही एका वयस्क गृहस्थांनी सांगितले. तितक्यात एका आजोबांनी शंका काढली. ‘तुमची आरएसएसमध्ये ओळख हा काय वो!,’ आजोबा म्हणाले. त्यांच्या प्रश्‍नाने मी चकीत झालो. कारण तो गाव आणि आजूबाजूच्या परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम नाही. गावातील मंडळींचा संघाशी कधी संपर्क आलेला नाही. तरीही आजोबा मात्र संघाबद्दल विचारत होते. ‘तुम्हाला कशाला संघ हवाय.’, असा प्रश्‍न मी त्यांना केला. त्यावर संघवाल्यांनी सांगितल्यानी तर भाजपवाले लवकर काम करतील, अशी पुश्ती त्या आजोबांनी जोडली. माझे लग्न झाल्यापासून मी दरवर्षी पत्नीच्या गावी जात आहे. मात्र मागील १६ वर्षांत संघ स्वयंसेवक पत्नीच्या गावी न पोहचताही संघ मात्र ति...
Image
मनसेने कात टाकली? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फेरीवालाविरोधी आंदोलन चांगलेच गाजले. मुंबई, पुण्यासारख्या बड्या शहरांमध्ये फेरीवाला ही समस्या होऊन राहिली आहे. कोणीही, कसाही, कुठेही धंदा करतो. त्याच्यासाठी कर भरणार्‍यांनी मात्र अंग चोरून चालायचे, अशी या शहरांची अवस्था होती. त्याबद्दल कितीही तक्रारी केल्या, विनंती, अर्ज केले तरी फेरीवाल्यांवर कारवाई होत नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने फेरीवाल्यांबाबत काही नियम घालून दिले होते. फेरीवाल्यांना रेल्वे स्थानकापासून दिडशे मीटरच्या परिसरात बसू द्यायचे नाही, असे स्पष्ट आदेश न्यायालयाचे होते. पण त्या आदेशाकडे कानाडोळा करत फेरीवाले मुंबईकर, पुणेकरांच्या जीवावर रस्त्यात, फूटपाथवर धंद करत होते. कायदे, नियम सर्व तयार असताना भ्रष्टाचारी सरकारी यंत्रणा मात्र फेरीवाल्यांवर कारवाई करायल तयार नव्हती. अशा परिस्थितीत मुंबईत एल्फिस्टन रोड रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना घडली. एक वेळी २३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. मुंबईतील या भयानक घटनेने मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकला. आपण असेच किड्यामुंगीसारखे मरत रहाणार. नियम, कायदे दाखवत परप्रांतियांच्य...
ब्राह्मण आणि आरक्षण सत्य हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आणि तीव्र असते. त्यामुळेच अनेकांना त्याची कास धरणे जमत नाही. पण म्हणून सत्याला नाकारून चालत नाही. ते कधी ना कधी पुढे येतं आणि त्याच्यासमोर असत्याला शरणागती पत्करावी लागते.  पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनीही मागील काही वर्षांपासून लपवून राहिलेलं सत्य उजेडात आणलं. नाशिकमधील एका कार्यक्रमात मुक्ता टिळक यांनी त्याला सर्वांसमोर मांडलं. आरक्षणामुळे ब्राह्मण मुले परदेशात जातात असे मुक्ता टिळक म्हणाल्या. त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. मुक्ता टिळक या आरक्षणाच्याविरोधात आहेत इथपर्यंत शोध लावण्यात आला. पण खरंच टिळक आरक्षणाच्याविरोधात होत्या का? त्यानंतर त्यांनी, त्यांच्या वक्तव्याबाबत खुलासाही केला. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असंं त्या म्हणाल्या. विपर्यास झाला की नाही, यातील खरं-खोटं टिळक आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेलेच जाणो. पण त्या जर ब्राह्मण मुले आणि आरक्षणाबाबत काही म्हणाल्या असतील, तर त्या गैर काय? सर्वात पहिले म्हणजे भारताच्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला, त्यांचे मत व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्...
Image
सर्वसामान्यच खरा अर्थतज्ज्ञ ७ नोव्हेंबर २०१७, वार : मंगळवार वेळ : सकाळी ६ वा. चाळीतील व्यायामशाळेत माझ्यासोबत दोन तरुण व्यायाम करत होते. व्यायाम संपल्यावर त्यांना सहज विचारले, ‘नोटाबंदीमुळे तुम्हाला काय अडचण आली?’ त्या दोन तरुणांपैकी एकाने सांगितले की, आम्हाला कायच अडचण नाही. पण नोटाबंदीमुळे खूप प्रॉब्लेम झाला असे सांगतात. आम्हाला तशी काहीच अडचण आलेली नाही. वेळ : सकाळी ७.३० वा. चाळीखाली रस्त्यावरील चहाचा स्टॉल. चहावाल्यालाच विचारले, ‘परशा नोटबंदी झाली त्यामुळे तुला काय प्रॉब्लेम आला का रे?’ तो उत्तरला, ‘अहो साहेब, नोटबंदी झाल्यापासून बीएमसी खूप त्रास द्यायला सुरुवात केली आहे. अगोदर महिन्यातून कधीतरी चोरगाडी यायची. आता रोज येते. खूप त्रास होतोय साहेब. बाकी कायच त्रास नाय बघा.’ वेळ : सकाळी ८.१० वा. दारात आलेला भय्या मासेवाल्याकडून पत्नीने मासे घेतल्यावर त्याला नोटबंदीबद्दल विचारले. तो म्हणाला, साहाब फिरसे होनेवाली है क्या नोटबंदी? वो टाईम थोडी तकलिफ हुई| पर बाद में सबकुछ ठिक रहा| अब कुछ प्रॉब्लेम नही है| वेळ : सकाळी ९.३० वा. चाळीखाली आलेल्या टॉमेटोवाल्याला विचारताच तो म्हण...