सेना-भाजपने एकत्र यावे राज्यात यापुढे शिवसेना-भाजप युती होणार का, हा प्रश्न आता शिल्लक राहिलेला नाही. सुमारे तीन दशके या दोन पक्षांनी मांडलेला संसार आता जवळजवळ तुटला आहे. राजकारणातील मतभेदापासून ते नळावरील भांडणापर्यंत अनेक गोष्टी युतीमध्ये झाल्या. २०१४ सालच्या विधान सभा निवडणुकीपूर्वी तुटलेली युती जरी हे दोन्ही पक्ष राज्यात एकत्र आले असले तरी अद्याप सांधलेली नाही. कारभार एकत्र होत असला तरी मने दुभंगलेलीच आहेत. त्यामुळे हे दोन पक्ष पुन्हा निवडणुकीसाठी एकत्र येतील असे कोणीही ठामपणे सध्या तरी सांगू शकत नाही. नेमका हाच या दोन पक्षांचा घात ठरू शकतो. कारण हिंदुत्त्वाच्या मुद्यावर एकत्र आलेले हे दोन पक्ष आज त्याच मुद्याने जोडले जाऊ शकतात. दुसरे म्हणजे सेना किंवा भाजपने कितीही ठरवले की, आपण अन्य कुठल्या तरी पक्षांशी घरोबा करावा तरी ते शक्य नाही. आतापर्यंत या दोन्ही पक्षांना कथित सेक्युलर पक्षांनी जातीयवादी म्हणून हिणवले आहे. त्यातच या कथित सेक्युलर पक्षांना पर्याय म्हणून मतदार या दोन पक्षांच्या मागे उभा राहिलेला आहे. त्यामुळे या सेना-भाजप पैकी कोणीही कॉंग्रेस अथवा राष्ट्रवादीशी घरोबा केल...
Posts
Showing posts from November, 2017
- Get link
- X
- Other Apps
बहुजन आणि दलित राज्यात गैरकॉंग्रेसी सरकार आले की, दलितांवर अन्याय, अत्याचार होत असल्याची आवई उठवली जाते. कथित सवर्णांकडून दलितांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप होतो. हे सवर्ण कोण? देशातील ब्राह्मण अत्याचार करण्याच्या मनस्थितीत नाहीत. आताच ते अल्पसंख्याक झाले आहेत. अनेक ब्राह्मण तरुण देशात वाव नाही म्हणून अगोदरच परदेशात स्थायिक झाले आहेत. ब्राह्मणांचे दलितांशी रोटी-बेटीचे व्यवहारही झाले आहेत. अशा परिस्थितीत ते खरंंच दलितांवर अन्याय, अत्याचार करतील का? मग अन्याय, अत्याचाराचा कांगावा करून सवर्ण कोणाला ठरवलं जातंय? उजवी विचारसरणी, देशनिष्ठा, देशाचा गौरवशाली इतिहास, भारतीय संस्कृती, सणांबद्दल आस्था ठेवणारे या सर्वांनाच सवर्ण या संज्ञेत सामावून त्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जातेय. त्यातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नेहमीच अशा अत्याचाराचा कांगावा करणार्यांचा बळीचा बकरा झालाय. त्याचा बागुलबुवा उभा करून डावे पक्ष आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम करत आहेत. त्यातून मग हिंदु प्रथा-परंंपरांना मानणारे आरोपी ठरवले जात आहेत. ही नवी विचारसरणी देशाला आणि देशाच्या अखंडत्त्वाला घा...
- Get link
- X
- Other Apps
बहुजन समाज म्हणजे काय? बहुजन हा शब्दच मुळात आर्थिक निकषांवर समाजात निर्माण झालेल्या वर्गांबाबत आहे. त्यात जातीचा कोणताच संबंध येत नाही. एखादा व्यक्ती आपल्या गरिबीमुळे अपेक्षित सर्वसामान्य जीवन जगू शकत नाही. संघर्ष करूनही त्याला दोनवेळचे पोटाला मिळत नाही ती व्यक्ती बहुजन समाजात मोडते. मग ती ब्राह्मण असेल अथवा दलित. त्यात जातीचा कोणताही प्रश्न येत नाही. अशी व्यक्ती समाजातील वरिष्ठ वर्गाच्या दबावात असते. तिला मूठभर आर्थिक संपन्न लोक नियंत्रित करत असतात. अशा शोषित व्यक्ती संख्येने जास्त असल्यामुळे त्यांचा समाज तयार होतो, तोच बहुजन समाज असे गृहित धरणे अपेक्षित आहे. समाजात वावरताना अशा शोषित व्यक्ती असंख्य दिसतात. त्या व्यक्तींना रहाण्यासाठी घर, अंगभर कपडे, कमाईचे साधन आणि मुख्य म्हणजे दोन वेळेचे जेवण आवश्यक असते. तरच त्या व्यक्तींना मनुष्य म्हणून पाहिले जाऊ शकते. या मूलभूत गरजा न भागलेल्यांचा आणि ज्यांच्या या गरजा भागल्या आहेत, अशांचा एक समाज मानवाच्या उत्क्रांतीसोबत विकसित झाला तो अद्यापही कायम आहे, असे कार्ल मार्क्स एका ठिकाणी म्हणतो. अर्थात मार्क्सला जात, धर्म मान्य नसल्यामुळ...
- Get link
- X
- Other Apps
रा. स्व. संघाबद्दलचा आकस कशाला? मागच्या मे महिन्यात कोकणात पत्नीच्या गावी गेलो होतो. गावातल्या देवळात काही मंडळी बसली होती. त्यापैकी मला ओळखत असलेल्या एकाने माझी इतरांना ओळख करून दिली. हे पत्रकार आहेत, असेही पुढे सांगितले. त्यामुळे मग गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील अडचणींचा पाढा माझ्यापुढे वाचणे सुरू झाले. त्यातून मार्ग कसा काढता येईल याचीही विचारणा झाली. मुख्यमंत्र्यांपर्यंत गार्हाणे मांडा असेही एका वयस्क गृहस्थांनी सांगितले. तितक्यात एका आजोबांनी शंका काढली. ‘तुमची आरएसएसमध्ये ओळख हा काय वो!,’ आजोबा म्हणाले. त्यांच्या प्रश्नाने मी चकीत झालो. कारण तो गाव आणि आजूबाजूच्या परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम नाही. गावातील मंडळींचा संघाशी कधी संपर्क आलेला नाही. तरीही आजोबा मात्र संघाबद्दल विचारत होते. ‘तुम्हाला कशाला संघ हवाय.’, असा प्रश्न मी त्यांना केला. त्यावर संघवाल्यांनी सांगितल्यानी तर भाजपवाले लवकर काम करतील, अशी पुश्ती त्या आजोबांनी जोडली. माझे लग्न झाल्यापासून मी दरवर्षी पत्नीच्या गावी जात आहे. मात्र मागील १६ वर्षांत संघ स्वयंसेवक पत्नीच्या गावी न पोहचताही संघ मात्र ति...
- Get link
- X
- Other Apps
मनसेने कात टाकली? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फेरीवालाविरोधी आंदोलन चांगलेच गाजले. मुंबई, पुण्यासारख्या बड्या शहरांमध्ये फेरीवाला ही समस्या होऊन राहिली आहे. कोणीही, कसाही, कुठेही धंदा करतो. त्याच्यासाठी कर भरणार्यांनी मात्र अंग चोरून चालायचे, अशी या शहरांची अवस्था होती. त्याबद्दल कितीही तक्रारी केल्या, विनंती, अर्ज केले तरी फेरीवाल्यांवर कारवाई होत नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने फेरीवाल्यांबाबत काही नियम घालून दिले होते. फेरीवाल्यांना रेल्वे स्थानकापासून दिडशे मीटरच्या परिसरात बसू द्यायचे नाही, असे स्पष्ट आदेश न्यायालयाचे होते. पण त्या आदेशाकडे कानाडोळा करत फेरीवाले मुंबईकर, पुणेकरांच्या जीवावर रस्त्यात, फूटपाथवर धंद करत होते. कायदे, नियम सर्व तयार असताना भ्रष्टाचारी सरकारी यंत्रणा मात्र फेरीवाल्यांवर कारवाई करायल तयार नव्हती. अशा परिस्थितीत मुंबईत एल्फिस्टन रोड रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना घडली. एक वेळी २३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. मुंबईतील या भयानक घटनेने मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकला. आपण असेच किड्यामुंगीसारखे मरत रहाणार. नियम, कायदे दाखवत परप्रांतियांच्य...
- Get link
- X
- Other Apps
ब्राह्मण आणि आरक्षण सत्य हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आणि तीव्र असते. त्यामुळेच अनेकांना त्याची कास धरणे जमत नाही. पण म्हणून सत्याला नाकारून चालत नाही. ते कधी ना कधी पुढे येतं आणि त्याच्यासमोर असत्याला शरणागती पत्करावी लागते. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनीही मागील काही वर्षांपासून लपवून राहिलेलं सत्य उजेडात आणलं. नाशिकमधील एका कार्यक्रमात मुक्ता टिळक यांनी त्याला सर्वांसमोर मांडलं. आरक्षणामुळे ब्राह्मण मुले परदेशात जातात असे मुक्ता टिळक म्हणाल्या. त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. मुक्ता टिळक या आरक्षणाच्याविरोधात आहेत इथपर्यंत शोध लावण्यात आला. पण खरंच टिळक आरक्षणाच्याविरोधात होत्या का? त्यानंतर त्यांनी, त्यांच्या वक्तव्याबाबत खुलासाही केला. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असंं त्या म्हणाल्या. विपर्यास झाला की नाही, यातील खरं-खोटं टिळक आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेलेच जाणो. पण त्या जर ब्राह्मण मुले आणि आरक्षणाबाबत काही म्हणाल्या असतील, तर त्या गैर काय? सर्वात पहिले म्हणजे भारताच्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला, त्यांचे मत व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्...
- Get link
- X
- Other Apps
सर्वसामान्यच खरा अर्थतज्ज्ञ ७ नोव्हेंबर २०१७, वार : मंगळवार वेळ : सकाळी ६ वा. चाळीतील व्यायामशाळेत माझ्यासोबत दोन तरुण व्यायाम करत होते. व्यायाम संपल्यावर त्यांना सहज विचारले, ‘नोटाबंदीमुळे तुम्हाला काय अडचण आली?’ त्या दोन तरुणांपैकी एकाने सांगितले की, आम्हाला कायच अडचण नाही. पण नोटाबंदीमुळे खूप प्रॉब्लेम झाला असे सांगतात. आम्हाला तशी काहीच अडचण आलेली नाही. वेळ : सकाळी ७.३० वा. चाळीखाली रस्त्यावरील चहाचा स्टॉल. चहावाल्यालाच विचारले, ‘परशा नोटबंदी झाली त्यामुळे तुला काय प्रॉब्लेम आला का रे?’ तो उत्तरला, ‘अहो साहेब, नोटबंदी झाल्यापासून बीएमसी खूप त्रास द्यायला सुरुवात केली आहे. अगोदर महिन्यातून कधीतरी चोरगाडी यायची. आता रोज येते. खूप त्रास होतोय साहेब. बाकी कायच त्रास नाय बघा.’ वेळ : सकाळी ८.१० वा. दारात आलेला भय्या मासेवाल्याकडून पत्नीने मासे घेतल्यावर त्याला नोटबंदीबद्दल विचारले. तो म्हणाला, साहाब फिरसे होनेवाली है क्या नोटबंदी? वो टाईम थोडी तकलिफ हुई| पर बाद में सबकुछ ठिक रहा| अब कुछ प्रॉब्लेम नही है| वेळ : सकाळी ९.३० वा. चाळीखाली आलेल्या टॉमेटोवाल्याला विचारताच तो म्हण...
- Get link
- X
- Other Apps
एअर इंडियाची दुर्दशा कोणी केली? नरिमन पॉईंटला गेलो की, तेथील एका उंच इमारतीच्या गच्चीवर मान तुकवून, हात छातीखाली घेत सलाम करणारा महाराजा हमखास दिसायचा. त्या महाराजाच्या विमानातून कधी तरी प्रवास करायला मिळावा, ही इच्छा पुन्हा उचंबळून यायची. एअर इंडियाचा तो आयकॉन, किती तरी देशवासियांच्या मनात घर करून राहिला होता. आज महाराजा नाहीय पण एअर इंडियाने अनेकांच्या मनात केलेलं घर कायम तसंच आहे. तिच एअर इंडियाचे आता विकायाला काढावी लागणार हे ऐकल्यावर अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकले. आयुष्यात एकदा तरी विमानात बसावं, हे सर्वसामान्यांंच स्वप्न. त्याला भरारी देणारी एअर इंडिया कर्जाच्या बोजाखाली दबून जाऊन, तिचं खाजगीकरण होेणार याचे दु:ख सर्वांनाच आहे. एअर इंडियावर हजारो कोटी रुपयांचा कर्जाचा बोझा कोणी आणि कसा लादला? विमाने कितीही उशाराने उडोत अथवा त्यातील जेवण कसेही असो, तरीही भारतीयांची शान असलेलेल्या एअर इंडियाचे विमान कोणी जमिनीवर आणलं? याची उत्तरे शोधावीच लागतील. त्याचा शोध घेण्यासाठी २००४ सालात आपल्याला शिरावे लागेल. एअर इंडियाची आर्थिक स्थिती त्या वर्षापासून बिघडायला सुरुवात झाली. त्यावे...
- Get link
- X
- Other Apps
साप आण सोहळा! स्थळ: राजकीय पक्षाचे कार्यालय. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी. प्रत्येकजण कुजबुजल्यासारखे बोलतोय. कॅबिनमधून आता-बाहेर करणारे कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ. एकंदरीत वातावरणात काही तरी प्रचंड खदखदत होते. एक कार्यकर्ता कॅबिनमधून बाहेर येतो. बाहेर उभ्या असलेल्या एकाच्या कानात काही तरी कुजबुजतो पुन्हा आत जातो. इतर कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्याकडे आशाळभूत नजरेने बघू लागतात. ज्याच्या कानात कुजबुज झाली तोही धीरगंभीर अवस्थेत बाहेर रस्त्यावर कार्यकर्त्यांना गोळा करतो. आता काहीतरी ऐकायला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून रहाते. कुजबुज वाढते. मग तो कार्यकर्ता नेत्याच्या भूमिकेत शिरून आदेश सोडतो, ‘आपल्याला साप शोधायचा आहे. साहेबांनी तसे आदेश दिलेले आहेत. लवकर कामाला लागा. ’ अनेकांच्या चेहर्यावर प्रश्नचिन्हाचे जाळे आपोआप विणले जातेय. पुन्हा कुजबुज वाढते. आतापर्यंत साहेबांकडून असे आदेश कधीच आलेले नव्हते. साहेब जास्तीत जास्त काय तर कामाला लागण्याचे आदेश द्यायचे. पण आताच असा विचित्र आदेश कसा? पण कोणाला प्रतिप्रश्न करण्याची हिंमत झाली नाही. आदेश मिळताच कार्यकर्ते पांगले. पण सा...
- Get link
- X
- Other Apps
भाजपची सामाजिक समरसता प्रसिद्ध दलित कवी नामदेव ढसाळ हयात असताना त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला होता. त्यावेळी ढसाळ यांनी उच्चारलेलं एक वाक्य कायमचे मनात घर करून राहिलं. सामाजिक समरसता घरातून नव्हेतर रस्त्यातून समाजात शिरली पाहिजे, असे ढसाळ म्हणाले होते. मला या वाक्याचा अर्थ कळला नव्हता. म्हणून मी ढसाळांना त्याबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले की, सामाजिक समरसता घरातून सुरू झाली की, केवळ त्या व्यक्तीचे आणि कुटुंबाचे कल्याण होते. पण तीच जर रस्त्यावरून सुरू झाली तर ज्यांना खरंच समरसतेची गरज आहे, त्यांच्यापर्यंत ती पोहचते. ढसाळ यांच्या या वाक्याचा प्रत्यय नुकताच राज्यातील सरकारबद्दल आला. राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सामाजिक समरसतेच्या गोष्टी करतो. पण त्यांची समरसता व्यक्ती केंद्रीत, मंत्री, अधिकार्यांपुरतीच मर्यादीत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी समरसता असेल तर समाजाचे कल्याण कधी व्हायचे ते होईल मात्र मंत्री आणि अधिकार्यांचे भलं निश्चित होणार आहे. सामाजिक समरसतेचा ज्यांना खरोखरचं अर्थ कळला, ते समाजाचा नव्हे तर स्वत:चाच स्वार्थ साधू लागले तर बदनाम सामाज...
- Get link
- X
- Other Apps
फेरीवाला मुक्त मुंबई आम्हाला लखलाभ फेरीवाल्यांचा मुद्दा आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. फेरीवाला हवेत की नकोत, इथंपासून ते त्यांना जगण्याचा हक्क नाही का, असे युक्तीवाद झडू लागले आहेत. मनसेने त्यांच्याविरोधात भूमिका जाहीर केल्यावर लगेचच, काहीजणांना त्यांचा पुळका आला. फेरीवाल्यांमध्ये बहुसंख्येने असलेल्या परप्रांतियांच्या मतांसाठी कॉंग्रेस त्यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरली. हे सर्व होत असताना आता अभिनेता नाना पाटेकर यांनीही त्यात उडी घेतली आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी चांगले काम करणार्या नानांना फेरीवाल्यांच्या भाकरतुकड्याची चिंता सतावणे हे योग्यच आहे. प्रत्येकाला भारतीय संविधानाने रोजगार, काम-धंदा करण्याचे हक्क दिले आहेत. मात्र हे हक्क कायद्याच्या चौकटीतील आहेत. इतरांच्या हक्कांवर गदा येईल, अशी वागण्याची मुभा संविधानाने कधीच, कोणाला दिलेली नाही. मात्र आपल्याकडे आता कर्तव्य कोणालाही नकोत. हवेत ते फक्त हक्क. त्यासाठी संविधानाचा आधार घेत कोलांडउडी मारायला सर्वच सज्ज असतात. आपले हक्क सांगताना आपण कोणाच्या तरी अधिकारांवर गदा आणतोय याचे भान किती लोकांना असते? गेल्या काही वर्...